
नवी दिल्ली ः टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू चमकली. सोमवारी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्ये मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकले.
मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात क्लीन अँड जर्कमध्ये एकूण १९३ किलो (८४+१०९ किलो) वजन उचलले आणि यादीत अव्वल स्थान पटकावले.
३१ वर्षीय मीराबाई चानू गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती आणि तेव्हापासून ती दुखापतींशी झुंजत आहे. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये मीराबाईं चानूकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती आणि तिने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. २०२८ च्या लॉस एंजेलिस गेम्ससाठी नवीन ऑलिम्पिक वजनी गट लागू झाल्यानंतर मीराबाईंनी ४९ किलोवरून ४८ किलो वजनी गटात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला होता.
मीराबाईंनी या ४८ किलो वजनी गटात तिचे जागतिक अजिंक्यपद विजेतेपद आणि दोन राष्ट्रकुल क्रीडा पदके जिंकली आहेत, परंतु, २०१८ पासून तिने त्यात भाग घेतला नव्हता.