राज्य क्रीडा धोरणाची लवकरच पुनर्रचना – क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

  • By admin
  • August 25, 2025
  • 0
  • 102 Views
Spread the love

मुंबई ः २०१२ या क्रीडा धोरणाची लवकरच पुनर्रचना करण्याचे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. त्याचबरोबर राज्यातील क्रीडा प्रबोधिनी, स्वयंसिद्धा, स्पोर्ट्स नर्सरी या योजनांचे स्वरूप देखील बदलण्यात येईल असे सांगितले.

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील अनेक योजनांचा उल्लेख करून त्या थोडाफार बदल करून बंद झालेल्या अनेक योजना पुन्हा चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. सोमवारी राज्य क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ​ओंबासे यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन राज्यातील क्रीडा संदर्भात सविस्तर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *