
कन्नड तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा
कन्नड (प्रवीण शिंदे) ः कन्नड येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल, अली अलाना स्कूल आणि सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कन्नड व तालुका क्रीडा समिती कन्नड यांच्या विद्यमानाने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा यश क्लब कन्नड येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन कन्नड पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कन्नड क्रीडा संकुल समितीचे सदस्य व क्रीडा मार्गदर्शक प्रवीण शिंदे, तालुका क्रीडा संयोजक मुक्तानंद गोसावी, योगेश पाटील, राज्यस्तरीय कुस्ती पंच विजयसिंग बारवाल, राकेश निकम, अजित खांबट, शमाबी शिक्षण संस्थचे अध्यक्ष वसीम शेख, डी एस जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल दांडेकर, एजाज शहा, कडुबा चव्हाण, प्रशांत नवले, रविकुमार सोनकांबळे यांनी काम पाहिले, तसेच पंच म्हणून योगेश पाटील, मुन्ना शेख यांनी काम पाहिले.
क्रिकेट स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षे मुलांचा गट ः १. फातिमा कॉन्व्हेन्ट हायस्कूल कन्नड, २. कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कन्नड.
१७ वर्षे मुलांचा गट ः १. अली अलाना स्कूल कुंजखेडा, २. महात्मा फुले हायस्कूल पिशोर.
१९ वर्षे मुलांचा गट ः अली अलाना हायस्कूल कुंजखेडा.
१७ वर्षे मुलींचा गट ः सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कन्नड