
श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्माच्या कामगिरीकडे लक्ष
नवी दिल्ली ः भारताचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेने सुरू होणार आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरू होईल आणि अंतिम सामना ११ सप्टेंबरपासून खेळला जाईल. या स्पर्धेत चार दिवसांचे सामने खेळवले जातील. यावेळी एकूण ६ संघ जेतेपदासाठी स्पर्धा करतील, ज्यामध्ये उत्तर विभाग, दक्षिण विभाग, पश्चिम विभाग, पूर्व विभाग, मध्य विभाग आणि उत्तर-पूर्व विभागातील संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत खास करुन श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
दुलीप ट्रॉफी २०२५ मध्ये एकूण ५ सामने होतील. यापैकी २ क्वार्टर फायनल, २ सेमी फायनल आणि १ अंतिम सामना असेल. सर्व सामने नॉकआउट सामने असतील, पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. दक्षिण विभागाचा संघ दुलीप ट्रॉफीचा गतविजेता आहे, त्यांनी गेल्या वर्षी अंतिम सामन्यात पश्चिम विभागाचा ७५ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे पश्चिम विभाग आणि दक्षिण विभागाला दुलीप ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाचे नेतृत्व शुभमन गिल आणि दक्षिण विभागाचे नेतृत्व तिलक वर्मा करतील. भारताच्या आशिया कप संघात गिलचे नाव समाविष्ट आहे, त्यामुळे जर तो या स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी अंकित कुमार संघाची धुरा सांभाळू शकतो. याशिवाय, शार्दुल ठाकूर पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार आहे आणि अभिमन्यू ईश्वरन पूर्व विभागाचे नेतृत्व करणार आहे. त्याच वेळी, मध्य विभागाचे नेतृत्व ध्रुव जुरेल आणि उत्तर पूर्व विभागाचे नेतृत्व जोनाथन रोंगसेन ली करतील.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ
दक्षिण विभाग ः तलिक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीसन, त्रिपुराण विजय, आर साई किशोर, तनय त्यागराजन, विजयकुमार विशाक, निधीसिंग, एनपी भुजा, स्नेहल कौठणकर
पूर्व विभाग : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंग, दानिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनिषी, सूरज सिंधू जैस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी.
पश्चिम विभाग : शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आर्य देसाई, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सरफराज खान, रुतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवले (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, कोषेंद्र जैस्वाल, तुषार कोटियन, धर्मेंद्र सिंग जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.
उत्तर विभाग : शुभमन गिल (कर्णधार), शुभम खजुरिया, अंकित कुमार (उपकर्णधार), आयुष बडोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत संधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, आकिब नबी, कन्हैया वधावन.
मध्य विभाग ः ध्रुव जुरेल (कर्णधार), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, दानिश मलेवार, संजीत देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चहर, सरांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठौर, हर्ष दुबे, मानव सुथार, खलील अहमद
ईशान्य विभाग : रोंगसेन जोनाथन (कर्णधार), अंकुर मलिक, जाहू अँडरसन, आर्यन बोरा, टेची डोरिया, आशिष थापा, एस रूपेरो, कर्णजीत युमनाम, हेम छेत्री, पलजोर तमांग, अर्पित सुभाष भटेवरा (यष्टीरक्षक), आकाश चौधरी, जोथरोजी, फेम कोन्थन, अजय लामाबम सिंग.