संभाजीनगर येथे शुक्रवारी चॅम्पियन खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप

  • By admin
  • August 28, 2025
  • 0
  • 211 Views
Spread the love

 सावरपडा एक्सप्रेस कविता राऊत, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांची उपस्थिती


– ५५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार गौरव सोहळा

छत्रपती संभाजीनगर ः ऑलिम्पियन आणि सावरपडा एक्सप्रेस म्हणून परिचित असलेली कविता राऊत ही छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे छत्रपती संभाजीनगरच्या ५५० हून अधिक चॅम्पियनच्या पाठीवर सत्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप देणार आहे.


२९ ऑगस्ट हा दिवस प्रतीवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी क्रीडा भारती, छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेने २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व जळणाऱ्या ५५० पेक्षा अधिक खेळाडूंचा सत्कार आयोजित केला आहे.

शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कारार्थी कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत निराला बाजार स्थित तापडिया नाट्य मंदिर येथे हा सत्कार सोहळा होईल. महाराष्ट्राचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे यांच्यासह प्रमुख अतिथी असतील.

शहरातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे सदस्य आणि शहरातील क्रीडाप्रेमींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी एका प्रसिद्धीपत्रकात केले आहे. क्रीडा भारती व जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा, वरिष्ठ सहसचिव डॉ. दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी व अन्य मान्यवर सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कविता राऊत – जन्मजात धावपटू
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळील सावरपाडा येथे राहणाऱ्या कविता राऊत यांनी २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिचे बालपण अडथळ्यांनी भरलेले होते. परंतु, त्यापैकी कोणताही अडथळा तिला खेळाचा ‘महाकुंभ’ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकला नाही. २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये कविताने देशासाठी कांस्यपदक जिंकले होते. पाचवी वर्गाच्या पाठ्यपुस्तकात सरकारने तिचा उत्साहवर्धक प्रवास देखील धडा स्वरूपात समाविष्ट केला आहे.

सत्कारमूर्ती खेळाडू

शिवछत्रपती पुरस्कार विजेते
कशिश भराड, वैदेही लोहिया (तलवारबाजी), अनिता चव्हाण (व्हीलचेअर फेन्सिंग), सिद्धार्थ मोरे (शरीर सौष्ठव).

कबड्डी
अखिलेश चव्हाण, कृष्णा पवार, राजू राठोड, अमोल टाके, राहुल टाके, तुषार डांगे, योगेश चव्हाण, शुभम गवळी, समिक्षा शिंदे, एकता अहिरे, श्रेया ननावरे.

तलवारबाजी 
मोहिनी फेगडे, गिरीश धोंडफळे, अभिजित बोर्डे, सोहम लक्कस, शिवम पाटील, सत्यम पाटील, रोहन शहा, निखिल वाघ, यश वाघ, तुषार आहेर, समर्थ डोंगरे, मानसी हुलसूरकर, श्लोक मुठे, मानसी वाघ, हर्षवर्धन भामरे, स्पर्श जाधव, हर्षवर्धन औताडे, मयूर ढसाळ, कार्तिक राठोड, सई जाधव, हर्षदा वंजारे, वेदांत काळे, आरोह नलावडे, भाग्येश आव्हाड, वैष्णवी कावळे, रमा जगताप, आदित्य ठेंगे, आदित्य सागर ठेंगे, ऋषभ जाधव, हर्षदा झोंड, स्वराज डोंगरे, स्वामिनी डोंगरे, श्रेया मोईम, कृष्णा ढसाळ, यशश्री वंजारे, अनुष्का अंकमुळे, सन्मय क्षीरसागर, स्वरा खैरनार.

डॉजबॉल 
सुयश साळवे, प्राची वेळस्कर, अश्वजित गायकवाड, पूनम काळे, स्नेहा पवार, पल्लवी खर्गे, निखिल म्हस्के, समर्थ मळेकर, अल्पिता त्रिभुवन, वेदांत देवरे, महेंद्रानंद गायकवाड, वैभव सोनवणे.

बॉक्सिंग 
प्राजक्ता वानखेडे, सिद्धी जैस्वाल, नेहा वाघ, शेखर घाडगे, सृष्टी घाडगे, वेदिका ठोकळ, गुरू कुत्तरमारे, कस्तुरी भालेराव, विघ्नेश जगदाळे, अथर्व ढाकणे, समीक्षा मांजरमे, आरव बेळगे, ओवी अदवंत, रफीउद्दीन कादरी, विघ्नेश जगदाळे, इशांत लाहोट, राधिका जोगदंड, हर्षवर्धनसिंग दुलगज, विश्वजीत शुक्ला, शिवराय गरुड, सिद्दीकी मोहम्मद फैसलुद्दीन, प्राची जमाले.

बास्केटबॉल 
आदित्य खांडेकर, जय निकम, विनायक निकम, अर्णव देशमुख, सुदर्शन जाधव, माणिका सोधी, गणेश जहरवाल.

बॅडमिंटन
सदानंद महाजन, निनाद कुलकर्णी, संस्कृती सातारकर, उदयन देशमुख, विजय भंडारे, हिमांशू मोरे, आदित्य हर्सूलकर, सोनाली मिरखेलकर, प्रथमेश कुलकर्णी, सार्थक नलावडे, आदिती रेड्डी, उमेश महाजन.

आट्या पाट्या 
प्राजक्ता वानखेडे, स्नेहल मुळे, शुभांगी चौधरी, पायल मुकाडे, रोहन काळे, वंशिका कांबळे, संकल्प शेजवळ.

ॲथलेटिक्स 
साक्षी अकमर, पंकज आढाव, सरताज शेख, समृद्धी निकाळजे, लक्ष्मण राठोड, राजवीर चव्हाण, रितेश केरे, डॉ प्रफुल्ल जटाळे, सालेक शेख.

वुशु 
चंचल देवकाते, पवन सोनवणे, स्वरूप निर्मल, शरवरी राठोड, सय्यद हुसेन, स्वरा थोरात, माही नाईक, सुकन्या आगळे, विशाल शिंदे, समाधान गायकवाड, अक्षय सरदार, सेजल तायडे, सय्यद अब्दुल्ला, नोमन शाकेरुद्दीन, अनुष्का जैन, युवराज गायकवाड, सय्यद आयताब, अब्दुल मुजीब, आयुषी घेवारे, श्रद्धा भिकणे, सरस्वती रोंगे, शेख हम्माद अली, अजिंक्य नितनवरे, लयबा शेख, शेख जबाबा.

तायक्वांदो 
स्वरूपा कोठावळे, करण मंदाडे, अमृता गायकवाड, आदिरा कुलकर्णी, श्रेया डोल्हारकर, रुपाली तुपारे, रितेश गायकवाड, राधिका शर्मा, समृद्धी सांगळे, हर्षल भुईगळ, अद्वैत पारपेल्ली, हर्ष खांडवे, रुद्र पांडे, अथर्व लहरकर, ईश्वरी सोनवणे, किंजल सोनवणे, प्रणव कोल्हे, दिव्या इंगळे, सोमेश श्यामसुंदर, मोहित सिंग, निखिल सहानी.

स्विमिंग, पॅरा स्विमिंग
संविधान गाडे, देविदास झिटे, रितेश केरे, समृद्धी निकाळजे, स्मिता काटवे, अदिती निलंगेकर, भाग्येश देशमुख, राजवीर चव्हाण, रुस्तुम तुपे, मोहम्मद कदीर, सागर बडवे, हरीश सांगळे, दिगंबर घुंगसे, सचिन चव्हाण.

स्क्वॅश 
सौरभ गाडेकर, अजिंक्य शिवणकर, प्रियांका चाबुकस्वार, साक्षी गायकवाड, हृधन गाडेकर, यशोवर्धन राजळे.

सॉफ्टबॉल 
समृद्धी शिंदे, रत्नदीप मालुसरे, धर्मवीर गोंडगे, अक्षरा सोनवणे, अनन्या गायकवाड, ईश्वरी शिंदे, प्रशांत जाधव, शंतनू दुमणे, आदित्य नागलोत, पायल चुंगडे, ओंकेश उसरे, शिवराज बोराडे, रोहन काकडे,  वंशराज वाघ, सार्थक तुपे, रोहित तुपारे, धनंजय गोंडगे, विराज बोराडे, पृथ्वीराज बोराडे, वेदांत बोराडे, सुजित राठोड, यश गजलकर, संतोष अवचार, हरिओम अर्दड.


पिकलबॉल 
महेश परदेशी, शिवन्या परदेशी, अर्जुन अग्रवाल, आरुष अग्रवाल, क्षितीज आडगावकर, हीत सुराणा, लक्ष खिल्लारे, श्रवण वानखेडे, सांची खिल्लारे, आराध्या कोठारी, आरोही जगदाळे, नव्या पाटील, रुत्वी टाकसाळे, धनुष ठाकूर, तन्मय वैद्य, नैतिक सराफ, यज्ञेश टोके, अथर्व वडगिरे, सार्थक फाळके, आदित्य चव्हाण, अथर्व दांडगे, रुद्राणी शिंदे, आराध्या गौड, निरल वांजुळे, किमया भोलाणे, रिद्धिमा गुंगेवाड, जया भुमर, अदिती सिंग, श्रद्धा चव्हाण, वैष्णवी जोशी, आस्था कोथळकर, कृष्णा कोथळकर, अवनी दीक्षित, नियती करकरे, कृष्ण मंत्री, लक्ष खिल्लारे.

नेटबॉल 
अजय रगडे, जयवर्धन इंगळे, अजय राजपूत, संकेत बोंग​र्गे, साक्षी जाधव, सनी दाभाडे, राजवर्धन इंगळे, वैष्णवी खरात, दिपाली काळे, कीर्तिवर्धन मगरे, विक्रम​ सिंग संजय​ सिंग, रितेश दाभाडे, कैफ गुलाम, विक्की जाधव, करण जाधव, विक्की शेजूळ, विक्रम जाधव, जयवर्धन इंगळे, पल्लवी वाकोडे, मानसी वायकोस, प्रीतम कदम, श्रुती उपाध्ये, विरोचन शिंदे,​ जिज्ञासा चौहान.

किकबॉक्सिंग 
आरव मिरकर, सृष्टी अकोलकर, राजवर्धन थोरात, विराज भालेकर, सारंग जाधव, हर्षाली कुंटे, ओजल सूर्यवंशी.

खो​-खो 
राहुल नाईकनवरे, दिव्या बोरसे, आकांक्षा क्षीरसागर,​ शुभम पोळ, आकांक्षा हरकळ, सार्थक डांगे, दिशा इंगळे, रोहित बोर्डे.

कराटे
अंशुमन मिरकर, प्रीशा करपकांडे, सुनिधी जाधव, सोहम देशपांडे, पृथ्वीराज सेठी.

ज्युदो 
रुषिकेश पुंड, आरती अधाने, सुभान शहा, त्रिवेणी काळे, श्रद्धा चोपडे, शंभू चोपडे, श्रुतकिर्ती खलाटे.

हॉकी 
भाग्यश्री शिंदे, श्रावणी गायकवाड, किशन चौहान, काजल आटपाडकर, शालिनी साकुरे, दिपाली आगाशे, प्राची कटारे, प्रगती भांडेकर, अर्पिता सरोदे, किशोरी काठोळे, प्रेरणा एरंडोळे, लावण्य बावणे, गणेश गौतम, गणेश दुहिरे, पूर्वा दुपारे, आंचल क्षीरसागर, कीर्ती ढेपे शिफा मुलाणी, राजू पाचवणे, श्रद्धा ढाकणे, दिव्या घोडके, राहिल खान, वैष्णवी पंढरे.

जिम्नॅस्टिक्स 
सलोनी म्हस्के, सौम्या म्हस्के, साहिल माळी, हर्षल आठवले, प्रिया आगलावे, आर्यन फुले, गौरी ब्रह्मे, साक्षी डोंगरे, प्रेम बनकर, अद्वैत कचेश्वर, एशिका बजाज, साक्षी लड्डा, स्वराज गट्टूवार, विश्वेश पाठक, स्वराज गट्टूवार, अनुष्का राखेवर, अभय उंटवाल, रोहन पगारे, संकेत चिंतलवाड, ओम सोनी, राधा सोनी, अद्वैत वाजे, स्मित शाह, निर्णय मुश्रीफ, सायली वझरकर, पार्थेश मरगपवार, रिद्धी मेहता, उदय मढेकर, कुशल पाटील, रामदेव बिराजदार, श्रेया तळेगावकर, अनुश्री गायकवाड, प्रांजल जोनवाल, साहिल माळी, मुग्धा भावसार, प्रणित बोडखे, सान्वी सौंदळे, वेदांत पाटील, पुष्टी अजमेरा, श्वेता राऊत, पार्थ रामशेटवाड, अनुराग देशमुख, सुहानी तायल, रिया नाफाडे, रिद्धी जैस्वाल, श्रीपाद हरळ, अवंतिका सानप, अक्षया कलंत्री, स्वराली पेहरकर, अनिकेत चौधरी, इशिका बजाज, रिधिमा आव्हाड.

ड्रॉप रो बॉल 
सचिन चव्हाण, मानसी शिरसाठ, अंजली विश्वकर्मा, सुरेश तोटावार, गोपाल आढे, संदिप राठोड, सचिन पवार, अरविंद चव्हाण, सौरभ चव्हाण.

हँडबॉल 
उत्कर्ष चौधरी, दीक्षांत वैष्णव, आदित्य बोडखे, आदित्य गाडवे, आदित्य रामकिशन ​गाडवे, नवनाथ राठोड, प्रसाद जाधव, आकांक्षा मोरे, ​दीपाली काळे, कोमल तांबे, राहुल गवळी, सायली किरगत, राकेश वानखेडे, शुभम पुंडगे, शारदा बनकर.

ग्रेपलिंग 
तृप्ती वाघमारे, शिवराज कापसे, वैष्णवी तेली, श्रुती शिराळे. इनडोअर : वैष्णवी राऊत. 
गोल्फ​ – डॉ रणजित कक्कड.​ सॉफ्टबॉल क्रिके​ट​ – मयुरी चव्हाण.​ सॉफ्ट टेनिस ​- पियुष गायकवाड. स्केटिंग​  ः स्वरा लड्डा. सेपक टकरा​ – श्रेय​स गोडबोले, सुमेरा शहा, शिफा सय्यद. कुस्ती ​- आरती अधाने. व्हीलचेअर फेन्सिंग ​- वंदना सटवाल, विनय साबळे, रामा जगताप, एकनाथ पाचे, अनिता चव्हाण, सुनील वानखेडे. व्हीलचेअर क्रिकेट​ – दत्त भारती. टग ऑफ वॉर ​- प्रवीण आडे. ट्रायथलॉन ​- दर्शन घोरपडे, शिरीष यादव, अहमद अर्शद. टेनिस​ बॉल क्रिकेट ​- सुमित दावरगावे, स्वप्नील कांबळे, अनमोल कांबळे. योग ​- साईराम निंबेकर, स्वरा लड्डा. रग्बी ​- वैशाली चव्हाण, रमेश वसावे, अक्का पावरा, अभिषेक देशमाने. क्रिकेट ​- जयेश सिंग, आर्यन जाधव, यश तुपे. बेसबॉल: विशाल जारवाल, सचिन नाबदे, शुभम जारवाल. बुद्धिबळ ​- स्वरा लड्डा, पलक सोनी. रायफल नेमबाजी​ – ओंकार चव्हाण, आरोही देशपांडे, साईराज देशमुख, धनंजय नागपुरे. आर​ डी परेड ​- अनुज हरणे. मल्लखांब ​- सागर माळोदे, श्रुती ज्ञानेश्वर गायकवाड, योगिता दुरे. लॉन टेनिस​ – सांची खिल्लारे. कोचीघरी ​- सुभान शाह. आईस​ स्टॉक ​- बिभीषण चव्हाण, मेधावी फुटाणे, भूषण छल्लाणी. गिर्यारोहण ​- किशोर नावकर, सूरज सुलाणे, दत्ता सरोदे, विनोद विभुते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *