
छत्रपती संभाजीनगर ः दि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ ॲागस्ट दरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे सहाव्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत २८ जिल्ह्यातील २४० खेळाडू १०० पंच, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे करण्यात आले आहे. पुरूष संघाची निवास व्यवस्था संकल्प मंगल कार्यालय येथे तर महिला खेळाडू यांची व्यवस्था तिरुमला मंगल कार्यालय व व्यंकटेश मंगल कार्यालय येथे करण्यात आली आहे. पंचांची निवास व्यवस्था युथ होस्टेल बाबा पेट्रोल पंप जवळ करण्यात आली आहे.
स्पर्धे यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी विविध नियोजन समित्यांची स्थापना करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वागताध्यक्ष, प्रचार प्रसार प्रमुख, स्पर्धा व्यवस्थापक, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, उद्घाटन समारंभ, बक्षीस वितरण समारंभ, तांत्रिक समिती, खेळाडू डायस समितीचा समावेश आहे.
ही स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी, क्रीडा संघटक, विविध संघटनेचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, जिल्हा योग संघटनेचे सचिव तथा आयोजन समितीचे सचिव सुरेश मिरकर, आयोजन समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर संदीप जगताप यांनी केले आहे.
स्पर्धा व्यवस्थापक मुरलीधर जगताप, स्पर्धा प्रमुख छाया मिरकर, तांत्रिक समिती प्रमुख वैजनाथ डोमाळे, सुनिता डोमाळे, दिनकर देशपांडे, वर्षा देशपांडे, तेजल ठाकूर, संध्या बोधेकर, मंदाकिनी जगताप, पूजा सदावर्ते, अर्चना पटेल, मधुकर चव्हाण आदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.