
नांदेड येथे शुक्रवारपासून स्पर्धेला प्रारंभ
अमरावती (तुषार देशमुख) ः नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ नांदेड येथे दाखल झाला आहे.
नांदेड येथे २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्य सेपक टकरॉ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ज्युनियर व सब ज्युनियर संघ जाहीर करण्यात आला. ज्युनिअर संघात सार्थक विधळे, देवांग पाटील, संकेत आमले, सर्वेश ठाकरे, राजदीप काळे, स्वरीत भिलपवार, हर्षल परिसे, रुद्र पिटकलवार, यश कोचे, हर्षल बोंडसे, सर्वेश उमक सागर चौधरी, सक्षम राऊत, आर्यन गेडाम, पियुष दाभाडे यांचा समावेश आहे.सब ज्युनियर संघात अनुज पारिसे, श्रेयश धांडे, साहिल वानखडे, समर्थ कडू, प्रेम वाकोडे, वेदांत पवार, पियुष कुरवाडे, श्रेयांश शेळके, कर्तव्य किटूकले यांचा समावेश आहे.
या संघाचे प्रशिक्षक डॉ तुषार देशमुख आहेत तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ सुगंध बंड हे काम बघत आहेत. या संघाचे अमरावती जिल्हा सेपक टकरॉ संघटनेचे अध्यक्ष डॉ हनुमंत लुंगे, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष डॉ सुगंध बंड, सचिव आनंद उईके, जिल्हा प्रशिक्षक तथा शिवाजीयंस स्पोर्ट्स क्लबचे सचिव डॉ तुषार देशमुख, तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे पंकज उईके, प्रवीण मोहोड, प्रिया देशमुख, सुयोग गोरले, सचिन किटूकले आदींनी अभिनंदन केले आहे.