
नाशिक ः २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीच्या खेळासाठीच्या अनमोल योगदानाबद्दल त्यांचा जन्म दिवस भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले आहे. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशन यांच्या वतीने आणि सोमेश्वर मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने विविध क्रीडा प्रकारात सन २०२४-२५ या गेल्या वर्षांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या नाशिक जिल्ह्यातील विविध खेळांच्या खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता गोखले शिक्षण संस्थेच्या, बी वाय के कॉलेज येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. ज्या खेळाडूंनी या वर्षांमध्ये प्राविण्य मिळविले आहे अशा खेळाडूंनी आपला खेळ, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा स्तर, या स्पर्धेमध्ये मिळालेले प्राविण्य प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे.
या सन्मान सोहळ्यात नाशिकच्या सर्व पदक प्राप्त खेळाडूंनी सहभागी व्हावे आणि आणखी प्रगती करून आपल्या जिल्ह्याचे नांव देशात आणि संपूर्ण जगात गाजवावे असे आवाहन नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, खजिनदार हेमंत पांडे, सचिव अशोक दुधारे, संदीप सोनावणे यांनी केले आहे.