
छत्रपती संभाजीनगर ः रुफीट क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी भारतीय अ संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू मुक्ता मगरे हिचा सत्कार करण्यात आला.
डी ११ टी २० लीगचे संयोजक निलेश गवई यांनी अष्टपैलू क्रिकेटपटू मुक्ता मगरे हिचा सत्कार केला. मुक्ता मगरे हिने या स्पर्धेतही दोन सामने खेळून आपले कौशल्य दाखवले आहे. मुक्ता मगरे ही आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय महिला अ संघात निवड झाल्याबद्दल मुक्ता मगरे हिचा निलेश गवई, प्रवीण जैस्वाल व कृष्णा बोर्डे यांनी सत्कार केला.
शहरातील अष्टपैलू क्रिकेटपटू ईशांत राय याची मुक्ता मगरे ही पत्नी असून ईशांत राय यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. मुक्ता मगरे हिने प्रचंड मेहनत घेऊन भारतीय अ संघात स्थान मिळवले आहे. आगामी काळात मुक्ता मगरे हिला प्रचंड यश लाभो अशी अपेक्षा निलेश गवई याने व्यक्त केली आहे.