
नंदुरबार (मयूर ठाकरे) ः नंदुरबार जिल्हा खो-खो असोसिएशनची वार्षिक सभा जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा राजेंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सहसचिव डॉ राजेश सोनवणे, सदस्य प्रा मनोज परदेशी, जिल्हा सचिव अनिल रौंदळ, सहसचिव हरीश पाटील, खजिनदार विशाल सोनवणे तसेच सदस्य योगेश सोनवणे उपस्थित होते.
सभेत मागील वर्षातील स्पर्धांचा आढावा घेऊन चालू वर्षातील स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. जिल्हा अजिंक्यपद किशोर-किशोरी निवड चाचणी स्पर्धा आश्रमशाळा जळखे, ता. नंदुरबार या ठिकाणी होणार आहे.तसेच कुमार-कुमारी व पुरुष-महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे.

पंचांचा सन्मान
जून महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३३ पंचांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रा राजेश सोनवणे म्हणाले, “खो-खो खेळ प्रत्येक गावात पोहोचविणे हे पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. पंच हा खेळाचा आरसा असून पंचांची गुणवत्ता हीच खेळाचा दर्जा वाढवते.”
निवड समिती सदस्य
किशोर-किशोरी : अनिल रौंदळ, हरीश पाटील, सीमा मोडक.
कुमार-कुमारी : प्रा मनोज परदेशी, प्रा राजेश सोनवणे, अनिल रौंदळ.
पुरुष-महिला : प्रा राजेश साळुंखे, विशाल सोनवणे, प्रा राजेश सोनवणे.
प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक
किशोर गट : कुमार वळवी, रेखा वाळवी.
किशोरी गट : अनिल रौंदळ, ताई कोकणी.
कुमार गट : प्रकाश पावरा, विशाल सोनवणे.
कुमारी गट : अनिल रौंदळ, ज्योती ठाकरे.
पुरुष गट : हरीश पाटील, मनोज परदेशी.
महिला गट : अनिल रौंदळ, गायत्री वळवी.