
जळगाव ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाले यांच्या सहकार्याने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आठ व दहा वर्षाखालील मुले व मुलींकरिता जलतरण स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव येथे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण ३० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष डॉ उदयसिंग पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ पांडव, सचिव फारुख शेख, सहसचिव राजेंद्र ओक, सदस्य कमलेश नगरकर, खजिनदार व बेंडाळे कॉलेजच्या क्रीडा संचालिका डॉ अनिता कोल्हे व छाया चिरमाडे हे उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच म्हणून कमलेश नगरकर, राहुल सूर्यवंशी, मयुरा खरे, पंकज पांडव, प्रदीप बोदडे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
आठ वर्षाखालील मुले ः २५ मीटर फ्रीस्टाइल – प्रथम कनिष्ठ वाळे, द्वितीय स्पर्श मांडगे, तृतीय धनुष अग्रवाल. २५ मीटर ब्रेस्ट स्टोक – प्रथम दिव्या लुनिया, द्वितीय कबीर सोनवणे.
आठ वर्षाखालील मुली ः २५ मीटर फ्रीस्टाइल – प्रथम अविरा पांडव, द्वितीय अमायरा खाविया, तृतीय गौरंगी जंजाळे. २५ मीटर ब्रेस्ट स्टोक – प्रथम सानवी मुळे, द्वितीय प्रिया बाविस्कर, तृतीय जानवी लाडवंजारी.
दहा वर्षाखालील मुले ः ५० मीटर फ्रीस्टाइल – प्रथम मानस लाडवंजारी, द्वितीय निशांत देशमुख, तृतीय चैतन्य सपकाळे. दहा वर्षाखालील मुली ः ५० मीटर फ्रीस्टाइल – प्रथम गौरी बाविस्कर, द्वितीय हिनल चव्हाण, तृतीय अक्षता सिंग. ५० मीटर बेस्ट स्टोक – प्रथम अंजली भारुळे.