साने गुरुजी महाविद्यालयात क्रीडा दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

  • By admin
  • August 29, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

३५० विद्यार्थ्यांचा सहभाग

शहादा ः शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने क्रीडा साहित्याचे पूजन व क्रीडा मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ एम के पटेल यांनी पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करण्यात आले. समवेत विद्याश्रम स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा दिनेश पावरा, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस डी सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा कल्पना पटेल, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉ महेश जगताप, क्रीडा मंडळाचे सचिव तथा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ अरविंद कांबळे, डॉ मिलिंद पाटील, डॉ अनिल बेलदार, डॉ प्रशांत जगताप, डॉ खुमानसिंग वळवी, क्रीडा शिक्षक प्रा जितेंद्र माळी, प्रा के एच नागेश, डॉ वाझिह अशहर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ अरविंद कांबळे यांनी प्रस्ताविकेतून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांच्या कार्याचा उजाळा करून दिला. स्पर्धेच्या युगात यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने क्रीडा क्षेत्राशी गाठ जोडून पोलीस, सैनिक आर्मी भरती आणि  स्पर्धा परीक्षेचे  ध्येय समोर ठेवून परिश्रम घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा दिनेश पावरा यांनी केले. तसेच मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी व गरजे पुरताच करावा व स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करावे असे मनोगत प्राचार्य डॉ एम के पटेल यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. 
या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत ३५० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अरविंद कांबळे यांनी केले तर डॉ महेश जगताप यांनी आभार मानले. 

विद्यार्थ्यांकरिता अभिनव असा उपक्रम राबवून पोलिस/सैनिक/आर्मी भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील यांनी क्रीडा मंडळाचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी  डॉ गोपाल गवई, कार्यालयीन अधीक्षक सुनील भांडारकर, गोपाळ सोनार, डॉ जगदीश चव्हाण, डॉ सुधाकर उजगरे, डॉ राजेंद्र पाटील, डॉ रविंद्र माळी, डॉ राहुल पाटील, डॉ वाजिह अशहर, डॉ तुषार पाटील, प्रा मोहसीन पठाण, संजय विसावे, दिलवर ठाकरे, दिनेश बागले यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *