
नाशिक : अमेच्युअर कबड्डी फाउंडेशन महाराष्ट्र तसेच क्रीडा भारती नाशिक व नाशिक जिल्हा अमेच्युअर कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ३५ वी किशोर राज्य निवड चाचणी स्पर्धा नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम या ठिकाणी २९ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली आहे.
या स्पर्धेकरिता राज्यभरातून किशोर व किशोरी गटाचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, एकेएफआईचे जनरल सेक्रेटरी उशीरड्डी तसेच आमदार राहुल भाऊ ढिकले, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजक भारती जगताप, संजय पाटील, बाळासाहेब जाधव, किरण गुंजाळ, कलीम शेख, राम कुमावत, सागर जाधव, मुंजा शेळके यांनी दिली आहे.