
येवला ः नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत आयोजित येवला तालुकास्तरीय स्पर्धेत एसएनडी सीबीएसई शाळेचा १४ वर्षे वयोगटातील संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संचालक नरेंद्र दराडे, किशोर दराडे व रुपेश दराडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या प्राची पाटील आणि तालुका संयोजक नवनाथ उंडे यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
संघाच्या विजयामध्ये प्रशिक्षक अमोल गायकवाड, मच्छिंद्र देवकर व किरण गोरे यांचा मोलाचा सहभाग राहिला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मिळालेला हा यशाचा मुकुट शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.