मुंबईत बॉक्सिंग प्रशिक्षक पदासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

  • By admin
  • August 30, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

मुंबई ः मुंबईतील इच्छुक आणि पात्र बॉक्सिंग प्रशिक्षकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मुंबई खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात (केआयसी) बॉक्सिंग प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच एनआयएस डिप्लोमा, SAI-LNIPE-NSNIS लेव्हल 1 किंवा 2 प्रमाणपत्र, किंवा खेलो इंडिया प्रशिक्षक प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. उमेदवाराला राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असली तरी, योग्य उमेदवारांसाठी वयात शिथिलता दिली जाऊ शकते. इच्छुकांनी आपला बायोडेटा, शैक्षणिक व क्रीडा प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो यासह अर्ज सादर करावा.

निवड प्रक्रिया ‘खेलो इंडिया’ संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ सप्टेंबर २०२५ असून, अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतीय रत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन-पश्चिम, धारावी, मुंबई – ४०००१७ येथे प्रत्यक्ष किंवा dsomumbaicity@gmail.com या ईमेलवर सादर करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *