
ओतूर (जिल्हा पुणे) ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघीरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओतूर येथील शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिवस आणि बाबुरावजी घोलप साहेब कृतज्ञता अकॅडमी पोलीस, सैन्य व सरळ सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उद्घाटन व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ उमेशराज पनेरू यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमापूर्वी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या हॉकी खेळातील गौरवगाथा व मिळवलेल्या पदकांविषयी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित मान्यवरांना वाणिज्य विभागातील डॉ विनायक कुंडलिक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) लहु थाटे, ओतूर गावच्या सरपंच डॉ छायाताई तांबे, पोलिस हवालदार राजेंद्र आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ के डी सोनवणे यांनी स्पर्धा परीक्षा व विविध सरकारी नोकऱ्यांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सरपंच छाया तांबे यांनी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विनामूल्य पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले. एपीआय लहू थाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय लोकसेवा आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत सखोल माहिती दिली. तसेच या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी शिस्तबद्ध अभ्यास, योग्य दिशादर्शन, सातत्य, मेहनत तसेच आत्मविश्वास वेळ किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. यासोबतच विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन कसे करावे या विषयावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळा फेक, बॅडमिंटन व बुद्धिबळ खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र व मेडल्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर एन शिरसाठ हे होते. लेफ्टनंट डॉ निलेश हांडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचलन डॉ उमेशराज पनेरु यांनी केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नॅक कॉर्डिनेटर एकनाथ कबाडी, हिंदी विभाग प्रमुख राजेश रसाळ, मराठी विभाग प्रमुख वसंतराव गावडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख नंदकिशोर उगले, भूगोल विभाग प्रमुख ए टी पाडवी, निलेश काळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी राजेंद्र आंबवणे आणि विनायक कुंडलिक, दीपक बाबर, वैद्य मामा, गणेश डुंबरे, निखिल काकडे, महाविद्यालयाचे विद्यार्थी व वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांच्या लेफ्टनंट निलेश हांडे यांनी आजपर्यंत महाविद्यालयातील शिक्षण घेऊन सैन्य दल पोलीस दल व इतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती देऊन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शुभेच्छा देऊन करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी यांनी महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले.