
हिंगोली ः हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने उखळी येथील नेटबॉलच्या चार राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोलीच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळी येथील नेटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू आर्या रामप्रसाद चव्हाण, वैष्णवी विष्णू गायकवाड, भाग्यश्री गजानन पंडित, कोमल उमाजी मांडे यांचा सन्मान चिन्ह आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्काराबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावर, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, क्रीडा अधिकारी गणेश बोडखे, क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण यांचे या खेळाडूंचे नेटबॉल प्रशिक्षक कैलास माने, महेशकुमार काळदाते, मनोजकुमार टेकाळे, हिंगोली जिल्हा नेटबॉल अध्यक्ष शिवाजीराव घुगरे, हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव विठ्ठल महाले, गावचे सरपंच पुंडलीकराव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, माऊली झटे, गणपतराव गायकवाड, उपसरपंच मुंजाभाऊ मगर, अंगदराव गायकवाड, दीपकराव अंभोरे, मुख्याध्यापक मंगेश कुलकर्णी, दिनेश सोळंके, रमेश लांबुटे, रामदास वानखेडे, मनोज टेकाळे, सिद्धेश्वर भोसले, गोपाल खराटे, संदीप गायकवाड, बापुराव गायकवाड, विष्णू गायकवाड यांनी त्यांचे आभार मानले आहेत.