
ड्रीम फाउंडेशन व समर्थ करिअर अकॅडमीचा उपक्रम
सोलापूर ः हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ड्रीम फाउंडेशन व समर्थ करिअर अकॅडमीच्या वतीने १३ आदर्श क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकाचा पुरस्कार वितरण सोहळा समर्थ करिअर अकॅडमी कुबेर चेंबर्स येथे संपन्न झाला.
काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील, डी के आसावाचे माजी मुख्याध्यापक जितेंद्र पवार, सेंटर अकॅडमीचे शेखर वाघमारे, ड्रीम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणगी, समर्थ अकॅडमीचे संचालक रवी राठोड, संगमेश्वर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ आनंद चव्हाण, सोलापूर शहर शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे शहराध्यक्ष सुहास छंचुरे, क्रीडा शिक्षक सुभाष उपासे यांच्या उपस्थितीत १३ क्रीडा शिक्षकांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल, बुके, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशराज यांनी केले.
क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचा सन्मान
विरेश अंगडी (एस एच एन प्रशाला), प्रा विक्रांत विभुते (संगमेश्वर कॉलेज), संजय पंडित (दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला ), प्रा नावेद मुन्शी (एम ए पानगल उर्दू हायस्कूल व जुनियर कॉलेज), प्रशांत सूर्यवंशी (लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल), शिवानंद सुतार (गांधी नाथा रंगजी मराठी मीडियम विद्यालय), रोहन घाडगे (पी एस इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल), नेताजी पवार (भारती विद्यापीठ हायस्कूल), अब्दुल्ला चौधरी (सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल), रविंद्र चव्हाण (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल), राहुल मुनाळे.(सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल), प्रमोद कुनगुलवार (डी के आसावा), बबलू शेख (खो- खो, क्रीडा मार्गदर्शक).