
सोलापूर ः आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमेचे पूजन सावंत व आसिया यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक प्रतिज्ञा देण्यात आली. या विशेष दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेतील विजेती ईशा पटवर्धन हिचा सत्कार रागिनी कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा बेसबॉल असोसिएशन आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या १४ वर्षाखालील मुलींचा सत्कार रवीना व शेंडगे यांच्या हस्ते तर तृतीय क्रमांक संपादित केलेल्या १४ वर्षाखालील मुलांचा सत्कार मोनिका व उर्मिला मॅडम यांच्या हस्ते झाला.
तसेच सोलापूर जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेते ठरलेल्या १४ वर्षाखालील मुलांचा व उपविजेतेपद मिळवलेल्या मुलींचा सत्कार उषाराणी व ऐश्वर्या मॅडम यांच्या हस्ते झाला. विजेतेपद मिळवलेल्या १७ वर्षाखालील मुलींचा सत्कार लेखा, परवीन व सावंत मॅडम यांच्या हस्ते तर उपविजेते ठरलेल्या मुलांचा सत्कार आसिया व सावंत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांच्या वतीने “आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार” प्राप्त रवींद्र चव्हाण सरांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण व सचिवा ज्योती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.