जालना ः जालना येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट म्हणून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मान्यवरच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माजी आमदार अर्जुन खोतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा संघटक गणेश सुपारकर आदींची उपस्थिती होती. ॲड राहुल गणेश सुपारकर आणि सहकारी व भूषण यादव व सहकारी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले.
माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते तेजल राजेंद्र साळवे या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू अमृता सोपान शिंदे, वैष्णवी बळीराम सोनटक्के, दीपाली भगवान जाधव, मोनिका निवास पवार, अनुष्का सचिन डिक्कर, साक्षी दीपक सिरसाठ, नंदा कैलास नागवे, बुशरा हुसेन शेख या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र बारगाजे यांनी केले. क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे यांनी आभार मानले. यावेळी विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, युवक-युवतींसह मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.
या कार्याक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लारे, क्रीडा अधिकारी आशिष जोगदंड, सिद्धार्थ कदम, संतोष प्रसाद, अमोल मुसळे, राहुल गायके, हारूण खान इत्यादींनी परिश्रम घेऊन यशस्वीपणे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन केले.