
नागपूर संघ उपविजेता, ठाणे संघ तृतीय
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या वरिष्ठ महिला व पुरुष राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावित स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने द्वितीय तर ठाणे जिल्ह्याने तृतीय स्थान पटकाविले.
विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव राजेश पवार, निवड समिती सदस्य अनिल मोहगावकर, डॉक्टर वैशिष्ट्य खोडसकर, विनायक अंजनकर, स्पर्धा प्रमुख छाया मिरकर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सदस्य सुहास पवळे, संजय देशमुख, देविदास सोनेकर, जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप, स्पर्धा व्यवस्थापक मुरलीधर जगताप, तांत्रिक नियोजन समिती प्रमुख वैजिनाथ डोंमाळे, आयोजन समिती सदस्य डॉ पंढरीनाथ रोकडे, दिनकर देशपांडे, महापालिका क्रीडा विभाग प्रमुख संजीव बालय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एशियन स्पर्धेतील महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा संजय मालपाणी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉक्टर संदीप जगताप यांनी केले. छाया मिरकर यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू (अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय)
सीनियर महिला (अ) पारंपरिक योगासन ः १) सोनाली करमाटे, सातारा, २) सीमा पवार, पुणे, ३) कल्याणी फुरसुले, छत्रपती संभाजीनगर.
वरिष्ठ पुरुष (अ) ः १) विवेक पाटील, २) श्रीकृष्ण तोंडे, छत्रपती संभाजीनगर, ३) सुमित हलवे, नागपूर.
वरिष्ठ महिला (ब) ः १) रामा झा, पुणे, २) शुफला शाहू, ठाणे, ३) नीता मुंदडा, अमरावती.
वरिष्ठ पुरुष (ब) ः १) विनायक रास्ते ,पुणे, २) शैलेश कदम, सांगली, ३) निलेश भोपाळे, नागपूर.
वरिष्ठ महिला (क) ः १) स्मिता अंकुशराव, मुंबई, २) राखी मुगले, पुणे. ३) सुमंगला कुन्नूर, ठाणे.
वरिष्ठ पुरुष (क) ः १) कल्पज कोकाटे, सांगली, २) जीवन निकाळजे, पुणे, ३) संजय चौगुले, कोल्हापूर.
सुपाईन महिला (अ) ः १) प्रियंका शिवारकर, नागपूर, २) चंचल माळी, जळगाव.
वरिष्ठ पुरुष (अ) ः १) श्रीकृष्ण तोंडे, छत्रपती संभाजीनगर, २) स्वप्नील इखर, अमरावती.
सुपाईन महिला ब ः १) मुग्ध मेहकर, मुंबई उपनगर, २) योगिनी पाटील, छत्रपती संभाजीनगर, ३) माधवी हिंगने, लातूर.
सुपाईन पुरुष (ब) ः १) रोहित चव्हाण, कोल्हापूर, २) दिगंबर काष्टी, पुणे, ३) परमेश्वर चौरे, धाराशिव.
सुपाईन महिला (क) ः १) दिव्या भोजवानी, गोंदिया, २) लक्ष्मी गोस्वामी, अमरावती, ३) सुलभा चव्हाण, छत्रपती संभाजीनगर.
लेग बॅलेन्स महिला (अ) ः १) बिस्मिल्ला शेख, कोल्हापूर, २) मीनल काकडे, अमरावती, ३) आरती चव्हाण, लातूर.
वरिष्ठ पुरुष (ब) ः १) चेतन कुमार भागवत, परभणी, २) योगेश वैद्य, पुणे.
लेग बॅलेन्स महिला (क) ः १) वर्षा मोडक, गडचिरोली, २) आशा सिंगल, ठाणे, ३) श्रद्धा पाठक, छत्रपती संभाजीनगर.
वरिष्ठ पुरुष (क) ः जगदीश भाये, नागपूर.
हॅन्ड बॅलेन्स महिला (अ) ः १) धनश्री लेकुरवाळे, नागपूर, २) सुलेखा पंडित, पालघर.
सीनियर महिला (ब) ः १) मंदाकिनी परदेशी, बीड, २) स्वाती विहीरे, लातूर, ३) मंजुश्री गिरी, छत्रपती संभाजीनगर.
वरिष्ठ पुरुष (ब) ः १) भारत डेलीकर, नागपूर, २) चंद्रकांत गिरी, बीड, ३) प्रमोद कळमकर, अमरावती.
बॅक बेंड महिला (अ) ः १) तेजस्विनी माने, लातूर, २) सीमा नागपुरे, गोंदिया, ३) मनीषा विटेकर, अहिल्यानगर.
बॅक बेंड महिला (ब) ः १) योगिनी पाटील, छत्रपती संभाजीनगर, २) प्राची बातपे, मुंबई उपनगर, ३) सुषमा पुरी, लातूर.
वरिष्ठ पुरुष (ब) ः १) शैलेश कदम, सांगली, २) निलेश ठोके, धुळे.
बॅक बेंड महिला (क) ः १) अर्चना कवठेकर, सांगली, २) वसुंधरा बोभाटे, गडचिरोली.
बॅक बेंड पुरुष (क) ः १) राहुल संघभोर, पुणे, २) शरद बोंदरे, बीड.
टेस्टिंग महिला (अ) ः १) सीमा पवार, पुणे, २) किरण लुल्ला, जळगाव, ३) बरखा नीचवाणी, गोंदिया.
वरिष्ठ पुरुष ः १) रविशंकर नागपुरे, गोंदिया, २) नवनाथ चित्रक, छत्रपती संभाजीनगर, ३) आशिष राजूरकर, अमरावती.
वरिष्ठ महिला (ब)ः १) ज्योती देहुरकर, चंद्रपूर, २) प्रीती शहा, पुणे, ३) शरयू विसपुते, जळगाव.
वरिष्ठ पुरुष (ब) ः १) सतीश साबळे, धाराशिव, २) निलेश भोपळे, नागपूर, ३) योगेश्वर सानप, पुणे.
वरिष्ठ महिला (क) ः १) दीपा नारकर, पुणे, २) अपर्णा फुले, मुंबई सिटी, ३) संगीता लाडे, नागपूर.
पुरुष क ः १) सुभाबासचंद्र नाईक, ठाणे २) अभय कडू, नागपूर, ३) संजय चौगुले, कोल्हापूर.
फॉरवर्ड बेंड महिला (अ) ः १) सोनाली खरमाटे, सातारा, २) रूपाली ढेंबरे, पुणे, ३) प्रियंका शिवरकर, नागपूर.
फॉरवर्ड बेंड पुरुष (अ) ः १) विवेक पाटील, ठाणे, २) हर्ष छेडा, मुंबई सिटी, ३) नवनाथ चित्रक, छत्रपती संभाजीनगर.
फॉरवर्ड बेंड महिला (ब) ः १) शरयू विसपुते, जळगाव, २) मुग्धा मेहेकर, मुंबई उपनगर, ३) सायली बोंपमवार, पुणे.
फॉरवर्ड बेंड पुरुष (ब) ः १) भारत डेलीकर, नागपूर, ३) विनायक रस्ते, पुणे, ३) चंद्रकांत गिट्टे, बीड.
महिला (क) ः १) राखी गुगले, पुणे, २) योगिता गोरे, नाशिक, ३) अपर्णा कवठेकर, सांगली.
पुरुष (क) ः १) जीवन निकाळजे, पुणे, २) कल्पेश कोकाटे, सांगली, ३) सत्यवान सुर्वे (वाशिम).