
धाराशिव ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव व डॉक्टर रामानुजन इंग्लिश स्कूल, उमरगा यांच्या वतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी लेझीम क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उमरगा शहरातील डॉ रामानुजन इंग्लिश स्कूल शाळेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
भारतीय पारंपरिक खेळ लेझीम, लाठी काठी, कराटे असे विविध खेळ घेण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला. खेळ हे जीवनासाठी किती आवश्यक आहे व त्याचे फायदे काय आहेत. याबद्दल सविस्तर माहिती महेश अंबर यांनी दिली. खेळ हा आपल्या जीवणाचा अविभाज्य अंग आहे. मन हे प्रफुल्लित राहण्यासाठी कोणता तरी एक खेळ खेळलाच पाहिजे असे विचार क्रीडा शिक्षक महमदरफी शेख यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद दुर्गारांनी बिद्री, श्रीनिधी घोडके, अंकिता पुजारी, संध्या मंमाळे, कांचन आलमाले, निशा कोकणे, शीतल बनसोडे, सचिन पाटील, संजना कोकुळवार, धुमाळ उज्वला, विवेक कांबळे, अनिता गडदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला माता पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.