
मुंबई (प्रेम पंडित) ः पहिली फुजैराह ग्लोबल सुपरस्टार्स बुद्धिबळ स्पर्धा ग्रँडमास्टर प्रणव वेंकटेश याने जिंकली. प्रणवने नऊपैकी सात गुण मिळवत स्पर्धा जिंकली आहे हे विशेष. त्याने व्हाईट पिसेससह जीएम अॅलन पिचॉटवर विजय मिळवला.
या स्पर्धेत प्रणवची २८४३ ची अद्भुत रेटिंग कामगिरी होती. त्याने ५ विजय नोंदवले आणि ४ गेम अनिर्णित ठेवले. त्याचे लाईव्ह रेटिंग आता २६२७.५ आहे. विद्यमान जागतिक ज्युनियर चॅम्पियन एक सुंदर ट्रॉफी आणि २३,००० अमेरिकन डॉलर्स (२०,२४,४१४ रुपये) घेऊन घरी परतला.