
छत्रपती संभाजीनगर ः कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथे झालेल्या सीबीएसई दक्षिण विभाग २ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराज विश्वासे याने संयुक्त विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याने सातपैकी सात गुणांची कमाई केली. परंतु, संघाच्या कामगिरीनुसार तो सहाव्या स्थानावर राहिला.
अंडर १४ मुलांच्या गटात अ टेबलवर खेळताना स्वराज विश्वासे याने शानदार कामगिरी बजावली. त्याने एस ललीत, अद्विक रावथ, चेतस नाईक, एन अथाजर, डीओनो, कार्तिक सोडागी यांना पराभूत केले.
या स्पर्धेत स्वराजला त्याचे वडील मनोज विश्वासे यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले. या कामगिरीबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रवींद्र राणा, क्रीडा शिक्षक दीपक सुरडकर, राहुल तांदळे यांनी स्वराजचे अभिनंदन केले आहे.
स्वराजचे प्रशिक्षण अंजली सागर यांच्याकडे सुरू आहे व हे यश त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, वुमन इंटरनॅशनल मास्टर तेजस्विनी सागर, विकास पालांडे, उमेश जहागीरदार, मिथुन वाघमारे आदींनी स्वराजते अभिनंदन केले आहे.