
पुणे : ३७ व्या पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिला बॉक्सिंग स्पर्धा भवानी पेठ येथील आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग स्टेडियम येथे रविवारी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण १४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत बेस्ट बॉक्सर पुरस्कार सुफियान शेख (क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान) तर मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर पुरस्कार स्वीटी यादव (पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स फाउंडेशन) यांना प्रदान करण्यात आला. तसेच बेस्ट चॅलेंजर पुरस्कार शुभम लांडगे (स्टार बॉक्सिंग अकॅडमी) याने संपादन केला.
या स्पर्धेचे उद्घाटन इंडियन बॉक्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी के मुरलीधरन राजा, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अभय छाजेड आणि क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले यांच्या हस्ते झाले. तर विजेत्यांना पुरस्कार माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी स्पर्धेचे मुख्य संयोजक व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, छत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, रेनॉल्ड जोसेफ आदी मान्यवर उपस्थित होते.
३० वर्षांची परंपरा
या प्रसंगी बोलताना अविनाश बागवे म्हणाले, “पुणे फेस्टिव्हलमध्ये मागील ३० वर्षांपासून बॉक्सिंग संघटना ही स्पर्धा सातत्याने आयोजित करत आहे. या व्यासपीठामुळे अनेक नामांकित बॉक्सर घडले असून, संघटनेचे हे कार्य यापुढेही सुरू राहील.”
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य तांत्रिक अधिकारी सुरेश गायकवाड, अशोक मेमजादे, जीवनलाल निंदाने, राम जगताप, बंडू गायकवाड, अमोल धनवडे, असिफ शेख, रॉबर्ट दास, प्रदीप वाघे, उमेश जगदाळे, कुणाल पालकर, मंगेश यादव आदींनी मोलाची सेवा बजावली. मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी केले.
स्पर्धेतील पदक विजेते
या स्पर्धेत सुविज्ञा दोडके, लक्ष्मी यादव, परी पारदे, स्वरा गायकवाड, सानिया सूर्यवंशी, सृष्टी जाधव, प्रियांका नेनावथ, स्वीटी बोरा, बिवा कुलकर्णी, काव्या जाधवके, पायल पवार, अनोमा लोखंडे, जानवी सांगळे, श्रावणी वाघमारे, मुग्धा कुंभार, अक्षरा काची, ऋत्विका जेठीठोर, कार्तिकी शितोळे, वेदांत भिलारे, नवनाथ प्रीतेश, क्रिश नेटके, नागेश देवरे, हर्ष बनसोडे, जीत गुजर, ऋतुराज गायकवाड, मिलन थापा, अविष्कार जगताप, अतुल यादव, लक्ष जाधव, राजवीर सूर्यवंशी रहतअली दरवाजकर, समर्थ जगडे, श्रेयस पाटोळे, फयाज हाश्मी, सार्थक वानखेडे, सोहम जगदाळे, अरींजय वाघे, श्रेयस सावंत, शौर्य त्रिवेदी, दिनेश यादव, हितेश स्वामी, अलकान शेख, अभिनय जाधव, श्रेयस सकपाळ, प्रियांशु काकडे, शिवराज महाकाल, सुफियान शेख, प्रणित साबळे या खेळआडूंनी आपापल्या गटात प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती सचिव विजय गुजर यांनी दिली आहे.