
जळगाव ः जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू चषक आंतरशालेय पंधरा वर्षांखालील मुले तसेच सतरा वर्षांखालील मुले व मुली यांची हॉकी स्पर्धा पोलीस कवायत मैदान जळगाव येथे संपन्न झाली. या स्पर्धेत विद्या इंग्लिश मीडियम स्कूल संघाने पंधरा वर्षे मुले व १७ वर्षे मुलींमध्ये सुवर्णपदक तर सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात उपविजेतेपद पटकावून तीन चषक पटकावले.
पंधरा वर्षे मुलं व सतरा वर्षे मुलींच्या गटात गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेतेपद पटकाविले तर तिन्ही गटात पोदार इंग्लिश मीडियम स्कूल संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
विजेत्या आणि उपविजेत्या संघांना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊसतर्फे चषक व मेडल प्रदान करण्यात आले. हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षक मीनल थोरात, हॉकी जळगावचे उपाध्यक्ष अक्रम शेख, झुलेखा देशमुख, हिमाली बोरोले, मुजफ्फर शेख, ममता प्रजापत, फुटबॉल प्रशिक्षक वसीम रियाज, विद्या स्कूलचे क्रीडा शिक्षक इमरान बिस्मिल्ला आदींच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत मुजफ्फर शेख, हिमाली बोरोले, इमरान बिस्मिल्ला, शहबाज पिंजारी, ममता प्रजापत यांनी काम पाहिले.
नेहरू हॉकी चषक स्पर्धा अंतिम निकाल
१५ वयोगट मुले ः १. विद्या इंग्लिश स्कूल, २. गोदावरी इंग्लिश स्कूल, ३. पोदार इंटरनॅशनल स्कूल.
१७ वयोगट मुले ः १. अँग्लो उर्दू हायस्कूल, २. विद्या इंग्लिश स्कूल, ३. पोदार इंटरनॅशनल स्कूल.
१७ वयोगट मुली ः १. विद्या इंग्लिश स्कूल, २. गोदावरी इंग्लिश स्कूल, ३. पोदार इंटरनॅशनल स्कूल.