
नागपूर ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री संताजी शिक्षण विकास संचालित संताजी महाविद्यालयात बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या. ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरातील सर्व खेळांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना त्यांच्या खेळांचे गणवेश वाटप करण्यात आले.
भारत सरकारकडून प्रेरणा घेतलेल्या खेळाडूंना शपथ देण्यात आली. सुरुवातीला उपप्राचार्य डॉ श्रीकांत पजनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर शेवटी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ प्रिया वंजारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच, ज्युनियर कॉलेजचे डॉ प्रेक्षणजय लिप्टे हे उपस्थित होते. वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ संजय खलटकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. मोठ्या संख्येने खेळाडू, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.