
आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे रक्षा खडसे यांना निवेदन
जळगाव ः जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू निवासासाठी पाच कोटींची तरतूद त्वरित करावी या मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केंद्रिय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांना दिले.
जिल्हा नियोजन समितीतर्फे केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत संजय सावकारे. खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे.यांनी जळगाव येथील क्रीडा संकुलात खेळाडू निवासासाठी पाच कोटींची तरतूद त्वरित करावी आणि नमो स्टेडियम पार्कसाठी १२ एकर जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी. जिल्हाधिकारी व आयुक्त सदर स्टेडियमसाठी एक वर्षापासून पत्र देऊनही जागा देत नाही असे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी डॉ प्रदीप तळवेलकर, इक्बाल मिर्झा, फुटबॉल संघटनेचे फारुख शेख, राजेश जाधव, दिलीप गवळी, प्रीतीश पाटील, किशोर चौधरी, कल्पेश कोल्हे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.