
सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजी संभाव्य संघात निवड झाली आहे.
हा संघ येत्या ४ सप्टेंबरपासून कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने बेंगलोर येथील निमंत्रित ४ दिवसीय क्रिकेट सामने स्पर्धेत सहभागी होणार असून या संघाचे नेतृत्व रणजी खेळाडू मंदार भंडारी करणार आहे. उजव्या हाताचा गोलंदाज असलेला नदीम हा गेले ३ वर्षे सोलापूर जिल्हा संघाकडून उत्तम कामगिरी करत असल्याने त्याची रणजी संभाव्य संघ आणि सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. नदीमच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे आणि संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.