
सोलापूर ः सोलापूर येथील श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या नेहा पवार हिने महाराष्ट्र महिला बेसबॉल संघात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला उपविजेतेपद मिळवून दिले.
संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे झालेल्या ३८व्या वरिष्ठ महिला बेसबॉल स्पर्धेत तिने भाग घेताना ही कामगिरी केली. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष विवेक चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कलाश्री देशपांडे, प्रा नागनाथ पुदे, प्रा विजय तरंगे, सुनील राठोड, अनिल राठोड यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.