
सोलापूर ः श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नेहरू नगर या महाविद्यालयात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस महाविद्यालयात वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष विवेक चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या कलाश्री देशपांडे, प्रा नागनाथ पुदे, प्रा विजय तरंगे, सुनील राठोड, अनिल राठोड इतर स्टाफ व सर्व विध्यार्थी यांनी सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.