
छत्रपती संभाजीनगर ः मंगळुर (कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल पंच परीक्षेत महाराष्ट्राचे सात पंच उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत पांडुरंग कदम, अक्षय ढेंगळे, असद शेख, अविनाश लांबुड, मनीषा सूर्यवंशी, कैलास वीर, अमोल सोलाट हे उत्तीर्ण झाले आहेत. महासचिव नरसिमा रेड्डी के, राज्य अध्यक्ष राजेंद्र पवार, सरचिटणीस एकनाथ साळुंके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.