
हिंगोली ः सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथील छोट्याशा गावातील रहिवासी असलेला धावपटू लक्ष्मण गोविंद राठोड याने महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत ४ बाय १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
यापूर्वी देखील लक्ष्मण राठोड याने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी नोंदवली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासातील मैदानी क्रीडा स्पर्धेतील तो पहिला खेळाडू आहे.लक्ष्मण राठोड याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून स्वतःच्या मेहनतीने तो राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेपर्यंतचा प्रवास त्याने गाठला आहे.
त्याची इच्छा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळण्याची असून, त्यासाठी लागणारा खर्च खूप आहे, हिंगोली जिल्ह्याला वर्षानुवर्षे सुवर्णपदक मिळवून देणारा लक्ष्मण राठोड हा एकमेव खेळाडू असून त्यावर हिंगोली जिल्ह्यातील उद्योगपती लोकांनी विशेष लक्ष देऊन या खेळाडूला मदत करावी असे आवाहन एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोलीचे सचिव गजानन आडे यांनी केले आहे.