
छत्रपती संभाजीनगर ः सायना नेहवाल इनडोअर स्टेडियम, एर्नाकुलम येथे होणाऱ्या २० व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना झाला आहे. ही स्पर्धा ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे झालेल्या २४व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेमधून सदर खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा या भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने होणार आहे.
या स्पर्धेसाठी डॉ मकरंद जोशी यांची स्पर्धा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच सिद्धार्थ कदम, अमेय जोशी, विवेक देशपांडे, ऋग्वेद जोशी हे पंच मंडळाची जबाबदारी पार पाडणार आहेत. संघासोबत हर्षल मोगरे, निलेश जोशी, हर्षद कुलकर्णी, ईशा महाजन आणि श्रिया कुलकर्णी यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली. संघ व्यवस्थापकाची जबाबदारी देवेंद्र राजगुरू आणि दिपाली बजाज पार पाडणार आहेत.
या संघाला महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, डॉ मकरंद जोशी, क्रीडा उपसंचालक डॉ मोनिका घुगे, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ सागर कुलकर्णी, डॉ विशाल देशपांडे, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंघे, प्रशिक्षक संजय मोरे यांनी सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे संघ
नॅशनल डेव्हलपमेंट ः ९-११ वयोगट – आरव देशमुख, इरा भालसिंग, अनन्या गरजे, अमोदिनी राखेवार.
१२-१४ वयोगट – अवंतिका सानप, अद्वैत काचेवार, आयुष मुठीयान, आर्यन फुले, अक्षया काळंत्री, निहार भोगले, प्रसाद बिराजदार, श्वेता राऊत, ओम सोनी, ईशिका बजाज, रिधिमा आव्हाड, स्वराज गटटूवार, रिद्धी मेहता, प्रणित बोडके, सूर्य सौंदळे, आराध्य वझे, दिति सारडा, श्रावणी सरोटे.
१५-१७ वयोगट – अनिकेत चौधरी, गौरी ब्रह्मणे, सान्वी सौंदाळे, विश्वेश पाठक, पुष्टी अजमेरा, सुहानी तायल, रिया नाफडे, निर्णय मुसरीफ, कार्तिकी हेकडे, जान्वी रोघे, मुग्ध भावसार, धनश्री खंडारे, अनुश्री गायकवाड.
१८ वयोगटावरील खेळाडू – आर्या शाह, मानसी देशमुख, उदय मधेकर, श्रीपाद हराळ, स्मित शाह, रामदेव बिराजदार, तनिष्क राजेगावकर, अद्वैत वझे, अभय उंटवाल, संदेश चिंतलवाड, सायली वझरकर, राधा सोनी, श्रेय लोंढे, रोहन पगारे, प्रेम बनकर, अदिती तळेगावकर, संकेत चिंतलवाड, विश्वेश जोशी, पार्थेश मार्गपवार, दीपक अर्जुन, श्रीपाद हराळ, तनिष्क राजेगावकर.