
व्यावसायिक, हौशी व कुमार गोल्फपटूंसह कॅडीजचाही सन्मान
पुणे ः पुण्यातील सर्वात जुन्या व नामवंत पूना क्लब गोल्फ कोर्सच्या वतीने व्यावसायिक व हौशी गोल्फपटूंसह प्रत्यक्ष मैदानावर त्यांना बहुमोल सूचना करून त्यांच्या यशाला हातभार लावणाऱ्या कॅडीजचाही सन्मान करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पुना क्लबच्या वतीने आयोजित एका पत्रकार परिषदेत विविध स्तरांवर क्लबला भरघोस यश व सन्मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा आणि क्लबच्या क्रीडा संस्कृतीचा सन्मान करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जाहीर करण्यात आले.
क्लबचे गोल्फ कॅप्टन जय शिर्के यांनी यावेळी सांगितले की, पुरुष, महिला व हौशी स्पर्धा मालिकांमध्ये पूना क्लबच्या खेळाडूंनी मिळवलेले दैदिप्यमान यश हे क्लबच्या गुणवत्तेचे निदर्शक आहेत.
यावेळी क्लबच्या खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांची अधरीकृत यादी जाहीर करताना पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक म्हणाले की, आमच्या व्यावसायिक खेळाडूंचे यश आणि हौशी खेळाडूंचा दर्जा, यामुळे पूना क्लबच्या गोल्फ संस्कृतीचे सामर्थ्य सिद्ध होत आहे.
ते पुढे म्हणाले की, या सर्वांच्या यशामुळे पूना क्लबला राष्ट्रीय क्रीडा नकाशावर मानाचे स्थान लाभले आहे. आगामी काळात गोल्फ विजेत्यांची नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून पूना गोल्फ कोर्स यांच्याकडून यावेळी अनुभवी व्यावसायिक खेळाडू, गुणवान हौशी खेळाडू आणि उदयोन्मुख कुमार खेळाडू यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील व्यावसायिक गटात प्रामुख्याने उद्यान माने, रोहन ढोले पाटील, प्रणव मर्डीकर, दिव्यांश दुबे, अनन्या गर्ग, मन्नत ब्रार, गुरकी शेरगील यांचा समावेश आहे.
पूना क्लब लिमिटेडचे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले यांनी या खेळाडूंचा गौरव करताना सांगितले की, या गुणवान खेळाडूंनी आपला अनुभव, कौशल्य व निर्धार यांच्या संगमातून क्लबचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करताना आपला दर्जा सिद्ध केला आहे. उदयन माने पासून प्रणव मर्डीकर पर्यंतच्या अव्वल खेळाडूंमुळे व्यावसायिक दर्जा उंचावला असून हौशी गटातही रोमांचकारी गुणवान खेळाडू भविष्यासाठी पुढे येत आहेत.
पूना क्लबच्या महिला गोल्फ कॅप्टन पद्मजा शिर्के म्हणाल्या की, अनन्या गर्ग आणि मन्नत ब्रार यांच्या सारख्या गुणवान युवा खेळाडूंच्या उदयामुळे क्लबच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही निश्चिन्त झालो आहोत. त्यांना त्यांच्या क्रीडा प्रवासात सर्वोतोपरी पाठिंबा देताना आम्हांला अभिमान व आनंद वाटत आहे. गोल्फ विकास समिती आणि कॅडी वेलफेअर समितीचे सल्लागार इक्रम खान, शशांक हळबे, आदित्य कानिटकर, मनिष मेहता आणि तुषार आसवानी आदी मान्यवर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पूना क्लबचे गुणवान व्यावसायिक गोल्फपटू
उदयन माने : भारतातील सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या उदयन याने या मौसमात सातत्यपूर्ण कामगिरी करून टॉप १० मध्ये अनेकदा स्थान मिळवले असून २०२५ हंगामाच्या पीजीटीआय मानांकन यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
रोहन ढोले पाटील : रोहन याने २०१९-२०२१ या काळात देशांतील अग्रमानांकित हौशी खेळाडू होता. यंदाच्या हंगामा एकदा टॉप १० कामगिरीसह तो मानांकन यादीत ४९व्या क्रमांकावर आहे.
प्रणव मर्डीकर : गेल्या मोसमात मानांकन यादीत ५५व्या स्थानावर असलेल्या प्रणव याने २०२५च्या मोसमात दोनदा टॉप १० फिनिशसह मानांकन यादीत ४७व्या क्रमांकावर प्रगती केली आहे.
दिव्यांश दुबे: वयाच्या १२ व्या वर्षांपासून गोल्फ खेळत असलेल्या दुबे याने २१व्या वर्षी भारतातील सर्वात आश्वासक युवा व्यावसायिक खेळाडूचा मान पटकावला आहे. त्याने यंदाच्या मोसमात ईस्टर्न इंडिया ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली आहे.
अनन्या गर्ग: गेल्या वर्षी वयाच्या केवळ १६व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू बनलेल्या अनन्या हिने २०२४ लेडीज युरोपियन टूर स्पर्धेत ३१ देशांमधील ११४ व्यावसायिक खेळाडूंमध्ये ४६वा क्रमांक मिळवताना आश्चर्यकारक कामगिरी केली. २०२५ मोसमात तिने एकदा उपविजेतेपद, एकदा तिसरा क्रमांक, दोनदा टॉप ५ मध्ये स्थान व पाच वेळा टॉप १० मध्ये स्थान अशा कामगिरीसह मानांकन यादीत ११वा क्रमांक मिळवला आहे.
आदित्य भांडारकर : २०२५ अहमदाबाद ओपन स्पर्धेत ५५वा क्रमांक मिळवला आहे.
व्यावसायिक कॅडी खेळाडू : प्रवीण पाठारे, समीर शेख व अक्षय दामले.
हौशी खेळाडू : आदित्य गर्ग, आकाश नाखरे, अमन ओसवाल, आर्किन पाटील, अवनीश सोमय्याजी, जिया कर्दभाजणे, विदिश कर्दभाजणे आणि विहान गजूला;
ज्युनियर गट: अभिराम महाजन, आदित्य पवार, अनिका कानिटकर, आर्यन ठाकूर, मिहीर कदम, रेहान पोंचा, स्वामिनी कुलकर्णी, वन्या सिंग, विवान कुदळे, रियान पोरवाल, आयरा मिश्रा, सुब्रमण्यम, आशिमा चाचारा, रुहान गुलाटी, आदोर दास, मोहनीश मेलवानी, सुमेध गांगल, अभी भूपतानी, विमल देव, शुभंकर शर्मा;
प्रशिक्षक : आदित्य कानिटकर, राजीव दातार, गुरकी शेरगील.
कॅडी : रमेश चाबूस्वार, आशिष जाधव, संतोष साठे, व प्रवीण सिंग.