
सोलापूर ः बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या अंडर १९ महिलांच्या टी २० सामन्यांसाठी सोलापूरच्या आर्या उमाप आणि भक्ती पवार यांची संभाव्य महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा हा संघ पुढील आठवड्यात विजयवाडा येथे सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर अंतिम संघाची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेला अंतिम संघ ऑक्टोबर महिन्यात मुंबईला रवाना होईल. मुंबई येथे टी २० चे राज्यांतर्गत सामने होणार आहेत.
आर्या उमाप व भक्ती पवार हिला किरण मणियार, सारिका कुरुलकर, मानसी जाधव-कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील तसेच संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सु यांनी अभिनंदन करून दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.