
नाशिक ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या कॅरम, कुस्ती, वुशू व सायकलिंग या विविध खेळांच्या स्पर्धेमध्ये लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाने चमकदार यश संपादन करुन वर्चस्व गाजवले.
या स्पर्धत अनुक्रमे १९ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजनी गटात निशांत जाधव याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत अनुसया गांगुर्डे हिने प्रथम क्रमांक मिळवला. वुशू या १९ वर्षांखालील स्पर्धेत निशांत जाधव याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सायकलिंग या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत तनुजा बागुल हिने प्रथम क्रमांक मिळवला
या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुचिता सोनवणे तसेच क्रीडा संचालक किशोर राजगुरू यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ प्रशांत हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ संपदा हिरे, विश्वस्त डॉ अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ योगिता हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे, उपप्राचार्य, डॉ सुचिता सोनवणे, पर्यवेक्षक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.