
दुलीप ट्रॉफी फायनल ः दक्षिण विभागाचा पहिला डाव गडगडला
बंगळुरू ः दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना दक्षिण विभाग आणि मध्य विभाग यांच्यात सुरू आहे. मध्य विभागाने दक्षिण विभागाचा पहिला डाव अवघ्या १४९ धावांत गुंडाळून पहिला दिवस गाजवला. सारांश जैन याने पाच विकेट घेत संघाला सामन्यात वर्चस्व मिळवून दिले.
मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. दक्षिण विभागाचा पहिला डाव १४९ धावांवर संपला. प्रत्युत्तरादाखल, मध्य विभागने पहिल्या दिवसअखेर बिनबाद ५० धावा काढल्या काढून संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात फिरकीपटू पूर्ण जोशात असल्याचे दिसून आले आहे.
दक्षिण विभागाचा डाव
प्रथम फलंदाजी करताना, दक्षिण विभागाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. दक्षिण विभागाचे चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. मोहित काळे नऊ धावा करून बाद झाले, स्मरन रविचंद्रन, कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन चार धावा आणि गुर्जापनित सिंग दोन धावा करून बाद झाले. रिकी भुई १५ धावा करून बाद झाले आणि तन्मय अग्रवाल ३१ धावा करून बाद झाले. सलमान निजारने २४ धावा केल्या. आंद्रे सिद्धार्थ १२ धावा करू शकला. अंकित शर्मा २० धावा काढून बाद झाला आणि निधिश १२ धावा काढून बाद झाला. सेंट्रल झोनकडून कुमार कार्तिकेयने चार आणि सरांश जैनने पाच बळी घेतले.
मध्य विभागाचा डाव
सेंट्रल झोनने एकही विकेट न गमावता ५० धावा केल्या आहेत. दानिश मालेवार २८ आणि अक्षय वाडकर २० धावांवर खेळत आहेत.