
अमरावती ः नांदेड येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर व सब ज्युनियर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत अमरावतीच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
अमरावती संघाने ज्युनियर व सब ज्युनियर मुलींच्या गटात उपविजेतेपद संपादन केले. या दोन्ही गटात अमरावती संघाला सोलापूर संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, प्रवीण कुपटीकर, समन्वयक डॉ विनय मुन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
अमरावती मुलींच्या संघाचे प्रशिक्षक डॉ हनुमंत लुंगे हे होते. या उपविजेत्या संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ सुगंध बंड, डॉ हरीश काळे, आनंद उईके, मुख्याध्यापिका अर्चना लुंगे, डॉ तुषार देशमुख, अतुल पडोळे, हेमंत देशमुख, प्रफुल गामणे, डॉ सुनील कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धेतील उपविजेता ज्युनियर संघ
कर्णधार आयुष दिवाण, जेशिका काळे, माही नागदिवे, भक्ती चौधरी, अंशिका दिवाण, श्रावणी लोणारे, तृष्णा आगळेकर, आरुषी शिंगाडे, रिद्धिमा शेलवट, परिदि तिडके, मानसी बंड, चर्या तिडके, रिया शेंडे, प्रांजली तायडे, प्रशिक्षक डॉ हनुमंत लुंगे, व्यवस्थापक डॉ हरीश काळे.
स्पर्धेतील उपविजेता सब ज्युनियर संघ
कर्णधार अंजली राठोड, अक्षरा तायवाडे, जान्हवी वानखेडे, नॅन्सी जयस्वाल, वैष्णवी जिवतोडे, गौरी जोहरे, तृप्ती बोज्जे, पूर्वी बिहान, आरोही दिवाण, भुवनेश्वरी सिंधुले, आरुषी रामटेके, मिस्टी साखरे, प्रशिक्षक डॉ हनुमंत लुंगे, व्यवस्थापक प्रगती तिडके.