
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अविष्कार २०२५ स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाला भरघोस यश मिळाले आहे.
जिल्हास्तरीय अविष्कार २०२५ या स्पर्धेसाठी देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या संशोधनात्मक साहित्य तयार करून या स्पर्धेत भाग घेतला होता.
जिल्हास्तरीय असणाऱ्या या स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या अविष्कार २०२५ साठी निवड झाली आहे. यात आदिती वाघ, वैष्णवी कायस्थ, अंजली ढेरे, शितल ठोंबरे आणि निशांत खरात यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला संशोधनात्मक विषय घेऊन त्याचे उत्तम सादरीकरण केले.
विजयी स्पर्धकांचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते आदी मान्यवरांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदरील विद्यार्थ्यांना अविष्कार २०२५ जिल्हा समन्वयक डॉ विष्णू पाटील, महाविद्यालय समन्वयक डॉ प्रणिता चिटणीस, डॉ मीनाक्षी धुमाळ, प्रा भूषण कुलकर्णी, प्रा देवकी पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.