
ठाणे (रोशनी खेमानी) ः ठाणे महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्री मावळी मंडळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ठाणे येथील विद्यार्थी कवीश प्रशांत शिंदे (अंडर १७ गट) याने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे त्याची विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या शानदार यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा प्रशिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच पालकवर्ग यांनी कवीशचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या यशामध्ये शाळेचे क्रीडा प्रशिक्षक प्रमोद वाघमोडे यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक या दोघांचेही हार्दिक अभिनंदन करण्यात आले. ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद ठरली असून विभागीय स्पर्धेसाठी कवीश शिंदे याला शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.