
सासवड ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन आर्चरी मुले स्पर्धेमध्ये इंडियन राऊंड या क्रीडा प्रकारात वाघिरे महाविद्यालय सासवड येथील प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या आदित्य चौधरी व समीर जाधव या दोन खेळाडूंची सर परशुराम महाविद्यालय पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही खेळाडू प्रशिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. सदर यशाबद्दल खेळाडूंचे प्राचार्य डॉ पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ बी यु माने, डॉ संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले.