राज्यस्तरीय जलतरण साक्षरता मास्टर्स पुरस्काराचे आयोजन 

  • By admin
  • September 13, 2025
  • 0
  • 60 Views
Spread the love

संयोजक राजेश भोसले यांची माहिती 

छत्रपती संभाजीनगर ः  जल हे जीवन आहे आणि ते मृत्यूचे कारण ठरू नये म्हणूनप्रत्येकाला जलतरणाची माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण ही काळाची गरज झाली आहे. कारण दररोज साधारण ६५० ते ७०० लोकांचा मृत्यू हा पाण्यात बुडून होतो असे वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशनचे म्हणणे आहे. दहा मुख्य अपघातांपैकी बुडून मृत्यू हे जगातील तीन नंबरचे कारण आहे. असे मृत्यू आपण थांबवू शकतो. यावर जनजागृती व साक्षरता हा एकमेव उपाय आहे. आपण जलतरणपटू म्हणून ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडत आहात. जलतरण साक्षरतेचे पुण्यकर्म करु इच्छिणाऱ्या वरिष्ठ गटातील मास्टर्स जलतरणपटूंसाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे एमजीएम स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे २६वी राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील २५ ते १०० वर्ष वरिष्ठ वयोगटातील खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरात जलतरण साक्षरतेची सुरुवात झालेली आहे.
या शहरात स्पर्धेनिमित्त हजर झालेले सर्व जलतरणपटू या ऐतिहासिक चळवळीचे साक्षीदार झाले आहेत. जलतरण हा खेळ खेळणे, विविध स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासोबत ही सर्व जलतरणपटू कळत नकळत जलतरण या खेळाचा प्रचार व प्रसार करत आहेत.

सातत्यपूर्ण सराव, निरंतर स्पर्धेत सहभाग, जलतरण संदर्भातील उपक्रमात सहभागातून या जलतरणपटूंनी जलतरणाची सेवा केली आहे. अशा वरिष्ठ जलतरणपटूंना राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने राज्यस्तरीय जलतरण साक्षरता मास्टर्स पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्यातून उपस्थित सर्व जलतरणपटूंनी आपली वैयक्तिक संपूर्ण माहिती (बायोडाटासह) पासपोर्ट छायाचित्रासह 95279 24646 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी असे आवाहन जलतरण साक्षरता समिती छत्रपती संभाजीनगरचे अशोक जगताप, मोहन सोनवणे, रवींद्र निकम, डॉ पंडीत पळसकर , गोपालकृष्ण नवले, डॉ विजय व्यवहारे, संतोष जोशी, रमेश शिंदे, सुनील पाटील, दीपक निचित आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *