
सेंट्रल झोन संघाचा ५११ धावांचा डोंगर, यश ठाकूरचे द्विशतक हुकले
बंगळुरू ः दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण विभाग संघाने दोन बाद १२९ धावा काढल्या असून डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप २३३ धावांची आवश्यकता आहे. सेंट्रल झोन संघाने पहिल्या डावात ५११ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
दक्षिण विभाग संघाचा पहिला डाव अवघ्या १४९ धावांत गडगड्लयाने सेंट्रल झोन संघाने सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कर्णधार रजत पाटीदारच्या (१०१) दमदार शतकानंतर यश राठोड याने शानदार १९६ धावांची खेळी करत संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. यश राठोड याचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. त्याने २८६ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार व २ षटकार मारले. अष्टपैलू सारांश जैन याने १९३ चेंडूंचा सामना करत ६९ धावांची खेळी केली आहे. त्याने सात चौकार मारले. दीपक चहर याने दोन षटकार व तीन चौकारांसह ३७ धावांची उपयुक्त खेळी केली. गुर्जपनीत सिंग (४-१२९) व अंकित शर्मा (४-१८०) यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
दक्षिण विभाग संघाने दुसऱया डावात ३३ षटकांच्या खेळात दोन बाद १२९ धावा काढल्या आहेत. तन्मय अग्रवाल (२६) व मोहित काळे (३८) ही सलामी जोडी बाद झाली आहे. स्मरण रविचंद्रन (नाबाद ३७) व रिकी भुई (नाबाद २६) ही जोडी खेळत आहे. सारांश जैन याने ३२ धावांत एक तर कुलदीप सेन याने २२ धावांत एक गडी बाद केला आहे. सामन्याचा चौथा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.