
अबु धाबी : पाठुम निस्संका (५०) आणि कामिल मिशारा (नाबाद ४६) यांच्या शानदार ९५ धावांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंका संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघावर सहा विकेट राखून विजय साकारला.
बांगलादेश संघाला १३९ धावांवर रोखल्यानंतर श्रीलंका संघाने धावांचा पाठलाग करण्यासाठी डावाची सुरुवात आक्रमकपणे केली. कुशल मंडिस (३) लवकर बाद झाल्यानंतर पाठुम निस्संका व कामिल मिशारा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ९५ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. पाठुम निस्संका याने दमदार अर्धशतक ठोकले. तो ५० धावांवर बाद झाला. कुसल परेरा (९), दासुन शनाका (१) लवकर बाद झाले. त्यानंतर कामिल मिशारा (नाबाद ४६) व चरिथ असलंका (नाबाद १०) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेने १४.४ षटकात चार बाद १४० धावा फटकावत विजय नोंदवला.
तत्पूर्वी, बांगलादेशची सुरुवात खराब झाली आहे. पाच चेंडूंतच संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नुवान तुषाराने तन्जीद हसनला बाद केले. त्यानंतर दुष्मंता चामिरा याने परवेझ हुसेन इमॉन याला बाद केले. दोन्ही फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. आता कर्णधार लिटन दासला साथ देण्यासाठी तौहीद हृदयॉय आला आहे.
बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेटसाठी १३९ धावा केल्या आहेत. झाकीर अली आणि शमीम हुसेन यांच्यात सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची नाबाद भागीदारी झाली. अनुक्रमे ४१ आणि ४२ धावा करून दोघेही नाबाद राहिले. श्रीलंकेकडून हसरंगाने दोन विकेट घेतल्या तर नुवान तुषार आणि दुष्मंथा चामीराने प्रत्येकी एक विकेट घेतली.