
ठाणे ः ब्राह्मण सेवा संघ, नौपाडा, ठाणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक दिन व शिक्षक गौरव समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभात क्रीडा शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल क्रीडा शिक्षक प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणादायी ठरले असून, त्यांच्या समर्पणाला समाजाकडून मिळालेली ही योग्य दाद असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा भावनांक कसा वाढवता येईल या विषयावर परिसंवाद झाला. तसेच पारंपरिक शिक्षक पूजन सोहळाही पार पडला. उपस्थित मान्यवरांनी वाघमोडे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.