
जव जवान जय किसान सैनिक स्कूल, सिंहगड पब्लिक स्कूलला पुरस्कार
सोलापूर ः सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील शहर व सर्व तालुक्यातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकूण २४ क्रीडा शिक्षकांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेचव दोन आदर्श शाळा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूर जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन अध्यक्ष प्राचार्य कार्तिक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शांती एज्युकेशन सोसायटीचे सचिव शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वैजिनाथ हत्तुरे (उपाध्यक्ष सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया), राज्य समन्वयक भारत इंगवले, जिल्हाध्यक्ष प्रा संतोष खेंडे, जिल्हा सचिव परमेश्वर व्हसुरे, शहराध्यक्ष सुहास छंचुरे, शहर सचिव गंगाराम घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत ए जी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या समर्थ सभागृहात हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य कार्तिक चव्हाण यांनी महासंघाकडून होणाऱ्या यापुढील विविध उपक्रमासाठी आमचे बीपीएड कॉलेज सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही महासंघाला दिली व सर्व आदर्श क्रीडा शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच वैजिनाथ हत्तुरे यांनी मन, मनगट, मस्तिष्क एखाद्या खेळाडूचे सुदृढ ठेवण्यासाठी क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्त्वाचे असते आणि तोच क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करू शकतो असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श क्रीडा शिक्षक व आदर्श क्रीडा शाळा यांचे आपल्या संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राजाराम शितोळे, श्रीधर गायकवाड, अजित पाटील, भगवान बनसोडे, रवींद्र डोंबाळे, रविराज माने, श्याम गुदपे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर व्हसुरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा संतोष खेंडे यांनी केले. सावंत यांनी आभार मानले.
जिल्हा पुरस्कार आदर्श क्रीडा शिक्षक
बापूराव तात्यासाहेब बाबर (मंगळवेढा), नागराज वीरप्पा कलबुर्गी (अक्कलकोट), रंजीत लोहार (माळशिरस), हेमंत गाढवे (बार्शी), विष्णू दगडे (पंढरपूर), सुनील भिवरे (सांगोला), मोहन आयवळे (मोहोळ), सिद्धेश्वर मारकड (मांढा), श्रीशैल व्हनमाने (दक्षिण सोलापूर), सुरेश शिंदे (उत्तर सोलापूर), प्रगती गोविंद कदम (विठ्ठल रावजी शिंदे विद्यालय माढा), इंद्रजीत मुळीक (करमाळा), सोलापूर शहर क्रीडा शिक्षक वीरेश अंगडी (एस एच एन प्रशाला), रवींद्र चव्हाण (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल), अमित येवलेकर (सेंट थॉमस इंग्लिश स्कूल), मनोज बाळगे (स्वामीनारायण गुरुकुल), संतोष पाटील (व्हॅलेंटाईन स्कूल), रोहन घाडगे (पी एस इंग्लिश मीडियम श्राविका स्कूल), मीरा गायकवाड (गांधी नाथा रंगजी इंग्लिश मीडियम हायस्कूल), अश्विनी पांढरे (एमआयटी विश्वशांती गुरुकुल), सनी भोसले (सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हायस्कूल), सुभाष माने (स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी), प्रबुद्ध चिंचोळीकर (सुयश गुरुकुल), अमित कोर्टीकर (व्ही एम मेहता प्रशाला).