
सोलापूर ः अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये सी बी खेडगी इंटरनॅशनल स्कूल संघाने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत उपांत्य सामन्यात शाहाजी हायस्कूल संघावर ९ गडी राखून विजय नोंदवत खेडगी स्कूलने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यांमध्ये मंगरुळे प्रशाला संघावर ९ गडी राखून विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करून उपविजेतेपद पटकावले.
१४ वर्षांखालील विजयी मुलांचा संघात प्रसन्न कोटणीस, रितेश माने, वीर लांडगे, हर्षवर्धन पवार, दर्शन म्हेत्रे. महाराजा पाटील, अक्षर थोरे, प्रणित कुपाडे, शशांक करजगी, आदिल चौधरी, संकेत गोरे, शाबुद्दीन पटेल, श्रेयश कामजे, सार्थक राठोड, विजय म्हेत्रे, अथर्व जाधव या खेळाडूंचा समावेश आहे.
१७ वर्षांखालील मुलींच्या संघात आसिया काझी, वेदिका राठोड, युक्ती राठोड, विरजा गोविंदे, आर्या जाधव, तन्वी चव्हाण, स्वाती हिप्परगी, सुप्रिया गायकवाड, मंजिरी मोरे, मन्हा शेख, राधिका चोंचळी, समृद्धी नडगम, पूर्वा चव्हाण यांचा समावेश आहे.
या दोन्ही संघांना क्रिकेट प्रशिक्षक सागर बनसोडे, क्रीडा शिक्षक अभिजीत बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाईस चेअरमन अशोक हारकूड, संचालिका पवित्रा खेडगी, प्राचार्य व्यंकटेश बक्षी, व्यवस्थापक रमेश हिप्परगी व शिक्षक संगमेश्वर धमुरे शशांक गुडगुटी मेघाराणी कलशेट्टी व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले.