
रजत पाटीदार आणि तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करणार
मुंबई ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला. हे तिन्ही सामने दुपारी १:३० वाजता कानपूरमध्ये खेळले जातील. पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी होईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
बीसीसीआयने तिन्ही सामन्यांसाठी वेगवेगळ्या संघांची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यात रजत पाटीदार भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रियंकर सिंह, अरविंद सिंह.
दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंह, युधवीर सिंह, अब्दुल सिंह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.