
विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भागीरथी विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ४ सुवर्ण, २ रौप्य अशी सहा पदके जिंकण्याचा पराक्रम नोंदवला आहे.
१७ वर्ष वयोगटात ५८ किलो वजन गटात श्रावणी जारवाल हिने जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला तर ६९ वजन गटात रितू सोनवणे ही द्वितीय स्थानावर राहिली. मुलांच्या ८८ किलो वजन गटात रोहित मोहिते याने द्वितीय क्रमांक मिळवला तर १९ वर्ष वयोगटत ६० किलो वजन गटात कृष्णा काकडे याने जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला. ६५ किलो वजन गटात संदीप जारवाल याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या ७७ किलो वजन गटात आचल कुमावत हिने जोरदार कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला.
प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या चार खेळाडूंची विभागीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. विद्यालयाचे हे खेळाडू विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे आणि ही गोष्ट विद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मीकराव सुरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पैठणकर, कोषाध्यक्ष विशाल सुरासे, प्राचार्य बी एम हजारे, क्रीडा अधिकारी राम मायंदे, छत्रपती संभाजीनगर वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव दीपक रुईकर, प्रमोद पठारे, क्रीडा शिक्षक भारत निंबाळकर, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रशिक्षक भाऊसाहेब खरात, संचालक दत्तात्रय सुरासे, सुनील भवर, प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभुते, गणेश जगताप, प्रमोद रिंढे, प्रवीण जाधव, मनीषा उभेदळ, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, भारत भोपळे, प्रवीण जाधव, निर्मला क्षीरसाठ, कटारे, गोकुळ पवार, जयश्री बोर्डे, सुरज साळवे, अधीक्षक मंजुषा सपकाळ, समाधान सुरासे, मंगेश दुतोंडे, दर्शन पाटील, ज्ञानदेव तायडे, किशोर साळुंखे, सुनील बोडखे, अमोल त्रिभुवन, विशाल साबळे, भगवान सुरासे आदींनी अभिनंदन केले आहे.